CM Eknath Shinde visit Lonavala: गडावरील पायऱ्यांची दुरुस्ती, संरक्षण भिंत, मुख्य मंदिराची दुरुस्ती, विश्रामगृह अशा ३९.४३ कोटी रुपयांच्या कामांचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
मावळात जाऊन कार्ला लेणी येथील भगवान एकवीरा मंदिराला भेट देणार
CM Eknath Shinde visit Lonavala: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (4 ऑक्टोबर) दुपारी मावळात जाऊन कार्ला लेणी येथील भगवान एकवीरा मंदिराला भेट देणार आहेत. गडावरील पायऱ्यांची दुरुस्ती, संरक्षण भिंत, मुख्य मंदिराची दुरुस्ती, विश्रामगृह अशा ३९.४३ कोटी रुपयांच्या कामांचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला लेणीजवळील भगवान एकविरा मंदिरात गुरुवारी घटस्थापना करण्यात आली. एकवीरा देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक कार्ला गडावर येतात. गडावर येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी खासदार बारणे यांनी पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्ला किल्ल्याचा कायापालट करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) ३९.४३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कंत्राटदाराला वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. या कामाचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
मंदिर परिसरात मंदिराचा जीर्णोद्धार, नगारखाना, स्तंभ, समाधी आदी कामे करण्यात येणार
CM Eknath Shinde visit Lonavala: मंदिर परिसरात मंदिराचा जीर्णोद्धार, नगारखाना, स्तंभ, समाधी आदी कामे करण्यात येणार आहेत. मुख्य मंदिर, नगारखाना यांची डागडुजी, खांब व समाधीच्या दगडी बांधकामाची साफसफाई व भराव, सध्याचा रंगमंडप काढून नवीन रंगमंडप उभारणे, मोकळ्या जागेत उद्यान निर्माण करणे, तिकीट घर व शौचालय बांधणे, दगडी फूटपाथ बांधणे. टेकडीला लागून, पायऱ्यांची दुरुस्ती, संरक्षण भिंत, शौचालय बांधणे, वाहनतळ, धबधब्याजवळील बंधाऱ्याची दुरुस्ती आणि विश्रांती क्षेत्राची निर्मिती, मध्यभागी थकलेल्या भाविकांसाठी पिण्याचे पाणी, बादल्या आणि कचराकुंड्या उभारणे, असे खासदार बारणे यांनी सांगितले. पायऱ्या, भाविक आणि पर्यटकांच्या माहितीसाठी आणि सुरक्षिततेसाठी सूचना फलक लावणे सुरू केले जाईल.